सिक्रेट हंट फॉर सुपस्टार स्पर्धेचा पुणे येथील आयोजित फिनाले साठी उपस्थित राहण्याचा योग आला. केअर फोर यू च्या प्रत्येक सदस्याचं मन अभिमानाने भरून यावं, आगळंवेगळं समाधान वाटावं, असाच एक क्षण होता.
मी केअर फोर यू ऑर्गनायझेशनचा एक अत्यंत नगण्य आहे हिस्सा आहे, तरी पण हा कार्यक्रम पाहताना मी केअर फोर यू संस्थेशी संलग्न आहे या गोष्टीचा मला खूप खूप आनंद वाटला.
अनाथाश्रमातील वंचित मुलांच्या प्रतिभेचा अद्भुत अविष्कार पाहून मन थक्क झालं.
या वंचित मुलांना अन्नदान करणे, वस्त्रदान करणे, थंडीच्या दिवसात ब्लॅंकेट इत्यादी देणे, इथं पर्यंतच आपली मदतीची, दानाची संकल्पना असते.
पण पायल या मुलांच्या फक्त मूलभूत शारीरिक गरजांचा विचार करत नाही, तीच व्हिजन अफाट आहे. याच्या खूप पुढे जाऊन ती मुलांच्या आयुष्यात निखळ आनंदाचे काही क्षण यावेत यासाठी प्रयत्नशील असते. आपल्या घरातील मुलांना ज्याप्रमाणे आपण वॉटर पार्क इत्यादी ठिकाणी सहलीला देतो त्याप्रमाणे वर्षातून एकदा त्या मुलांना अशा प्रकारच्या सहलीला घेऊन जाते.
ती या मुलांमध्येत दडलेल्या प्रतिभेला भव्य व्यासपीठ उपलब्ध करून देते. ती त्यांच्या डोळ्यांना भव्य दिव्य स्वप्न देते, स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी मदतीचा हात देते, पायांना बळ देते, पंखांना उभारी देते. आणि हे सगळं कुठलाही अभिनिवेश न दाखवता अत्यंत सहजपणे करते.
या कार्यात पायलच्या आई-वडिलांची भरपूर मदत आहेच, माहेरची माणसं हे मुलींना नेहमी पाठिंबा देतच असतात पण पायल चे पतीदेव रोशन राठी, तिच्या सासूबाई सासरे व सासरची इतर मंडळी
यांचा पायल ला असलेला शारीरिक आणि मानसिक सपोर्ट संपूर्ण कार्यक्रमाच्या दरम्यान क्षणोक्षणी जाणवत होता. यासाठी त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.