नमस्कार…
माझा टीम केअर फॉर यू या संस्थेबद्दल अनुभव असा आहे की……. अडचणीचा काळ असो अथवा काही मदतीची हाक असो, तुम्ही फक्त हाक मारा टीम केअर फॉर यू त्या अडचणीसाठी किंवा मदतीच्या हाकेसाठी सदैव तत्पर आहे. आज समाजात पाहिलं तर लोक स्वतःसाठी, कुटुंब नियोजनासाठी छोट्या-मोठ्या उद्योगधंद्यातुन, नोकरीतून भरपूर संपत्ती, धनदौलत कमवतात. परंतु समाजात काही ठिकाणी लोकांची अशी स्थिती आहे कि ते नाही स्वतःच्या पायावर काही करू शकत, नाही स्वतःचा उद्योग धंदा उभारू शकत. त्यामुळे अशा गोरगरीब लोकांवर जेव्हा जेव्हा अडचणी येतात, संकटे येतात आणि अशावेळी जे लोक अशा समाजातील गोरगरीब लोकांना मदत करतात, त्यांच्या गरजा भागवतात, त्यांनाच देवाचे देवदूत म्हणतात. आणि नेमका टिम केअर फॉर यू चा त्यावरच जास्त भर आहे. म्हणून मी एक वाक्य आठवणीने सांगेन “मला माझ्या आयुष्यात खरा देव तर कधी भेटला नाही परंतु टीम केअर फॉर यू च्या संस्थापिका सन्माननीय, आदरणीय, माझे प्रेरणास्थान, आदर्शस्थान CA. सौ. पायल सारडा राठी यांच्यात मी देवा पेक्षा काही कमी पाहिलेले नाही”. समाजातील लोकांना काही अडचण आली तर ते लोक देवाकडे जातात . परंतु मला काही अडचण आली तर मी पायल मॅडम कडे जातो.
मी लहानाचा मोठा अनाथाश्रमात झालो. बारावी पर्यंत मी त्या अनाथाश्रमात शिकलो. तिथेही मला खूप काही शिकायला भेटले. खूप काही संस्कार मिळाले. परंतु बारावीनंतर जिथे स्वतःला निर्णय घ्यायची वेळ आली. जिथे माझे पुढील शिक्षणाचे सर्व पर्याय संपले. मला असे वाटायलाच लागले होते की आता आपल्या पुढील शिक्षणाचे कसे व्हायचे, आणि अशाच मनस्थितीत मला भेटलेले देवदुत म्हणजे टीम केअर फॉर यू च्या संस्थापिका सन्माननीय, आदरणीय, माझे प्रेरणास्थान, आदर्शस्थान CA. सौ. पायल सारडा राठी. माझी संगीत शिकण्याची तीव्र इच्छा आहे. त्यासाठी त्यांनी मला अहमदनगर येथील प्रसिद्ध असलेल्या न्यू आर्ट्स कॉलेजमध्ये BA. Music करण्यासाठी तिथे ऍडमिशन करून माझी पूर्ण शिक्षणाची सोय केली. माझ्या पूर्ण संगोपनाची व्यवस्था तिथे करण्यात आली. सोबतच शास्त्रीय संगीताचे प्रायव्हेट क्लासेस त्यांनी जॉईन केले. सुगम संगीताचीही ऑनलाईन व्यवस्था केली आणि व्यवस्थित रित्या संगीताचं ज्ञान मिळावं म्हणून एक भारीतली हार्मोनियम घेऊन दिली. एवढं सार फक्त एक आईच करू शकते. मला आता वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटतं मी त्यांना मॅडम म्हणतो. एवढं सारं आई प्रमाणे त्या आपल्याला प्रेम देतात. मग आपण त्यांना माई का म्हणून नाही शकत…. म्हटलेच पाहिजे. कारण त्या नावानं नाही तर कर्तुत्वानं माई आहेत.
माझ्यासारखे असे भरपूर विद्यार्थी, विद्यार्थिनी टीम केअर फॉर यू संस्थेमार्फत शिकत आहे. माझ्यासारख्या अशा भरपूर मुलांचा त्यांच्या पाठीशी आशीर्वाद आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात ही खूप मोठी संस्था झाल्याशिवाय राहणार नाही. कारण हि संस्था बाकीच्या बाबतीत जरी लहान असली तरी कर्तुत्वाने ती खूप महान आहे. एवढी खात्री फक्त त्यांचा एक विद्यार्थीच देऊ शकतो. त्यामुळे अशा देव माणसांचं करावे तेवढे कौतुक, आणि मानावे तेवढे आभार कमीच आहेत.
धन्यवाद…..!